पुण्यातील इंदापूर तालुक्यात 20 वीट भट्टी कामगार आणि त्यांच्या 12 लहान मुलांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुकादम आगाऊ पैसे घेऊन फरार झाल्याने मालकांनी या 32 जणांना नजरकैदेत ठेवले होते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने त्यांची सुटका करण्यात आली असून, चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे