Pune| चाकणमधील खराब रस्त्यांवरून नागरिक आक्रमक, लेखी आश्वासन न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

चाकणमधील खराब रस्ते, वाढते अपघात आणि तीव्र वाहतूक कोंडी या प्रश्नांवरून नागरिकांचा संताप वाढत आहे.रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.दुसरीकडे, वाहतूक कोंडीमुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगार आणि कंपन्यांचेही मोठे नुकसान होत आहे. काही कंपन्यांनी स्थलांतराचा इशारा दिल्यानंतर प्रशासन हालचालीला लागले असले, तरी ठोस उपाययोजनांबाबत लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका समाजसेवक गणेश बोत्रे यांनी घेतली आहे. तसेच लेखी आश्वासन न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

संबंधित व्हिडीओ