पुणे महानगरपालिका (PMC) कर्मचाऱ्यांनी आज, 7 ऑगस्ट रोजी काळ्या फिती बांधून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. काल (6 ऑगस्ट) मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या कार्यालयात केलेल्या कथित दमदाटीचा निषेध म्हणून हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनामुळे महापालिकेचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.