महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुंबईतील वाहतूक आणि नो-पार्किंगच्या समस्येवर एक आराखडा सादर केला. स्मार्ट पार्किंग आणि फुटपाथला रंग देऊन पार्किंगसाठी जागा निश्चित करण्यासारख्या उपायांवर त्यांनी भर दिला. शहरातील वाढत्या वाहतूक समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.