नुसत्या चर्चाच की आणखी काही? Raj-Uddhav एकत्र येण्याची तयारी खरंच सुरु आहे का? | Special Report

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. खरं तर दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा या महाराष्ट्राला आता नव्याही राहिलेल्या नाहीयेत. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यापासून या चर्चा या त्या निमित्तानं होतच राहिल्यात. पण मुंबई महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना पहिल्यांदाच या चर्चा होतायेत आणि दोनही पक्षातील महत्त्वाचे नेते या चर्चांना सकारात्मक प्रतिसाद देतायत. दोन्ही ठाकरे बंधू या चर्चांसाठी अजूनही एकत्र आलेले नाहीयेत पण दोन्ही ज्यनियर ठाकरे मात्र या एकत्रीकरणासाठी उत्सुक असल्याचं स्पष्ट दिसतंय. दुसरीकडे ग्राउंड लेव्हल वर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आपली सकारात्मकता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये उघड उघड स्पष्ट केली आहे. 

संबंधित व्हिडीओ