युद्धविरामाच्या दुसऱ्या टप्प्याची बोलणी फिस्कटली असली तरी सध्या गाझामध्ये परतलेले नागरिक रमजान महिना साजरा करतायत. मात्र हा रमजान साजरा करणंही त्यांना सध्या कठीण झालंय. एकीकडे उध्वस्त घरांमध्ये रमजान साजरा करावा लागतोय. त्यातच युद्ध परतेल याची भीती मनात आहेच. त्यामुळे यंदा रमजान निमित्त नमाज पडताना हे नागरिक शांततेची सुरक्षिततेची मागणी करतायेत.