सणासुदीच्या निमित्ताने मुंबईतले चाकरमानी मोठ्या उत्साहाने गावाकडे धाव घेतात. पण गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांचा उत्साह ट्रॅव्हल्स वाल्यांसाठी लूट करण्याचा सोप्पा मार्ग झालाय. ऐन दिवाळीत खासगी ट्रव्हल्सवाले प्रवाशांकडून दुप्पट ते तिप्पट भाड्याची लूट करतायत आणि या लुटीला आळा घालण्यासाठी कोणतीच यंत्रणा कार्यरत नाहीये.. लोकांची दिवाळी प्रवास खर्चातच संपणार असेल तर दिवाळीला गावी जायचंच कशाला असा प्रश्न प्रवाशांना पडलाय.. पाहुयात खासगी ट्रव्हल्सकडून होणारी ही लूट उघड करणारा हा विशेष रिपोर्ट..