Vikas Lawande यांना ताब्यात घेतल्यानंतर Rohit Pawar- Shashikant Shinde वाघोली पोलीस ठाण्यात दाखल

शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंना पुण्याच्या वाघोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय.वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या विधानावरून ताब्यात घेतल्याची माहिती समोर येतेय.दुसरीकडे विकास लवांडेंवर शाईफेक करणारे संग्राम भंडारे यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई केली नाही यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेयत.रोहित पवार वाघोली पोलिसांच्या भेटीला दाखल झालेत. विकास लवांडेंना ताब्यात घेतल्यानंतर रोहित पवार आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.

संबंधित व्हिडीओ