राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून थंडावली होती मात्र संजय राऊतांनी पुन्हा एकदा या चर्चेला हवा घातलीय.मनसेबाबत सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही.असं राऊतांनी म्हटलंय.मनसे युतीसाठी दिलसे भूमिका घेणार असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले. त्याचवेळी मनसे युतीसाठी नात्याची जोड देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र पडदा कधी उघडायचा हे दोघं भाऊच ठरवतील असं सूचक विधानही राऊतांनी केलंय.दरम्यान,युती करायची असेल तर पत्रकार परिषद घेऊन उपयोग नाही, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिलीय.. संजय राऊत युती करण्यासाठी सकारात्मक आहेत असे सांगतायत त्यावरून आम्हाला शंका आहे असंही त्यांनी म्हटलंय.