माढा तालुक्यात सीना नदीच्या पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे... घर, संसार वाहून गेलाय..त्यामुळे आता जगायचे कसे? अशी चिंता नागरिकांना आहे. एकीकजे ही स्थिती असताना, माढा तालुक्यातील मुळ गाव असणारे उंदरगाव, वाकाव सोडण्याचा निर्णय काही लोकांनी घेतला आहे. तुटपुंजा संसार घेऊन लोकांनी गाव सोडायला सुरुवात केली. सीना नदीच्या महापुरामुळे थेट विस्थापित होण्याची वेळ नागरिकांवर येऊन ठेपली..