महाराष्ट्राला हादरवणारी.. अत्यंत सुन्न करणारी बातमी... अमरावतीमध्ये जिल्हा स्त्री रुग्णालयाला लागलेल्या आगीत निष्पाप बाळांचा होरपळून मृत्यू झालाय. रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. अतिदक्षता विभागात असलेल्या व्हेंटिलेटरमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन भीषण स्फोट झाला. क्षणार्धात संपूर्ण वार्डात धुराचे लोट पसरले. या आगीत 3 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झालाय. ही आग इतकी भीषण होती की, नवजात बालकांच्या कक्षात असलेले एसी आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या आहेत. व्हेंटिलेटरचा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचं कारण अजूनही समोर आलेलं नाही. अमरावतीमध्ये झालेल्या दुर्घटनेबाबत रुग्णालायचे अधिष्ठाता नंदकिशोर राऊत यांनी मोठा दावा केलाय... सरकारी रुग्णालयात निष्कृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर वापरले होते, किंवा रुग्णालयात वापरलेलं वायरिंग कमी दर्जाचं होतं.. त्यामुळे शॉर्टसर्किट झाल्याने ही घटना घडली असा दावा राऊत यांनी केलाय.