Kankavli| केळीच्या वखारींवर FDAची कारवाई, केळी पिकवण्यासाठी केमिकलचा वापर केल्याची तक्रार

कणकवली शहरातील मधलीवाडी येथील एका केळीच्या वखारीची आज अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. या वखारीमध्ये केमिकल वापरून केळी पिकवली जात असल्‍याच्या तक्रारी होत्या. त्‍याअनुषंगाने ही कारवाई झाल्‍याची चर्चा आहे. अन्न अाणि औषध प्रशासनच्या अधिकाऱ्यानी केळी वखारीची संपूर्ण पाहणी केली. तसेच पिकविलेल्‍या केळ्यांचे नमुनेही घेण्यात आले आहेत. आजवर या वखारीवर कारवाई झाली नव्हती. मात्र अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्‍तपदाचा कार्यभार तुकाराम मुंडे यांची स्वीकारला. त्‍यानंतर प्रथमच या वखारीची अन्न आणि औषध प्रशासनाकडून तपासणी करण्यात आली.

संबंधित व्हिडीओ