Amravatiच्या दुर्घटनेनंतर Akola जिल्हा स्त्री रुग्णालयात नगरसेवकांची पाहणी, रिक्त पदं भरण्याची मागणी

अमरावतीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात सतर्कता वाढवण्यात आली असून, आज महापालिका नगरसेवक तथा रुग्णसेवक पराग गवई यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षाची प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि 14 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असतांना केवळ दोनच डॉक्टर नियुक्तीवर असून बाकी प्रतिनियुक्तीवर कार्यरत असल्याची गंभीर बाब समोर आली. यादरम्यान, रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून, तातडीने पदे भरण्याची जोरदार मागणी नगरसेवक पराग गवई यांनी वैद्यकीय अधीक्षक बापूराव पवार यांच्या मार्फत राज्य शासनाकडे केली.

संबंधित व्हिडीओ