सोन्याच्या दराने पुन्हा एकदा विक्रमी पातळी गाठली आहे. गेल्या आठ दिवसांत सोन्याच्या भावात तब्बल 12 हजार रुपयांची वाढ झाली असून, 24 तासात सोन्याचे भाव 1 हजार रुपयांनी वाढले आहे. जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचा भाव आता 1 लाख 62 हजार रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचे भाव मात्र 2 लाख 48 हजार रुपयांवर स्थिर आहेत. जागतिक बँकांकडून सुरू असलेली सोन्याची खरेदी, तसेच डॉलरच्या मूल्यात झालेली घसरण यामुळे सोन्याच्या दरात तेजी आल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. जळगाव सुवर्णनगरीतून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी.