अन्न व औषध प्रशासन विभागाने सुट्टे खाद्यतेल विक्रीवर बंदी घातली आहे मात्र याचा ग्राहकांवर परिणाम होत असल्याची दृश्य नजरेस पडतायात. नाशिकच्या पेठरोड फुलेनगर परिसरात मजूर, रोजंदारीवर काम करणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर राहतो. 3-4 दिवसाआड सुट्टे तेल या महिला खरेदी करत असतात मात्र आता त्यांना सुट्टे तेल मिळत नसल्याने या महिलांकडून नाराजी व्यक्त केली जात असून आधीच महागाईमुळे आम्ही त्रस्त झालेलो असतांनाच सुट्टे तेल विक्रीवरील बंदी आम्हाला न परवडणारी असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.