साखरेचे भाव वाढत असताना ऊसाला भाव नाही. साखर कारखानदारांनी साखरेची साठवणूक करून ठेवली असल्याचा संशय आहे. अशातच केंद्र सरकारने साखरेचे आयात धोरण आणले. या साखरेच्या आयात धोरणाला आता शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करायला सुरुवात केली आहे. याच बाबत पंढरपुरात शेतकरी संघटनांची बैठक झाली. या बैठकीमध्ये आयात धोरणाला विरोध झाला असून तुकाराम मुंढे सारखा अधिकारी साखर आयुक्त म्हणून आणावा. तसेच , कारखान्यांच्या चेअरमननी साखरेची साठवणूक करून नेपाळ, बांगलादेश ,पाकिस्तानला साखर विकली असल्याचा आरोपही या बैठकीत झाला आहे. त्यामुळे साखरेचे भाव वाढत असताना आता कारखानदारांच्या विरोधात आणि सरकारच्या आयात धोरणाच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याच बाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी...