मराठीवरून नोटीस बजावलेल्या रिक्षाचालकांचा गट हायकोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय..सध्या मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना नोटीस दिल्या जातायत. राज्यभरात गेल्या चार दिवसांत अडिच हजाराहून अधिक रिक्षाचालकांना नोटिसा बजावल्याची माहिती आहे. आता ज्या चालकांना नोटीस बजाण्यात आल्यात, त्यापैकी काही रिक्षाचालक नोटीसविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे.. मराठी शिकण्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसताना या नोटीस बजावल्याचा चालकांचा आक्षेप आहे.