Shirdi| साखरेची 'दरवाढ'.. प्रसादाचा 'गोडवा' कमी करणार, साईंच्या शिर्डीत प्रसाद महागणार

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आता प्रसाद महागण्याची शक्यता आहे. साखरेच्या वाढत्या दराचा थेट परिणाम पेढे, मिठाई आणि इतर प्रसादाच्या किमतींवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. होलसेल बाजारात साखरेच्या दरात तब्बल ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने प्रसाद निर्मितीचा खर्च वाढला आहे. या वाढत्या खर्चाचा भार सध्या प्रसाद विक्रेत्यांवर पडत असून, आगामी काळात दरवाढ करण्याबाबत व्यापाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

संबंधित व्हिडीओ