मराठी सक्तीचा रिक्षा चालकांनी घेतला धसका, कारवाईच्या भीतीमुळे तात्पुरती वाहन बंदठेवण्याचा निर्णय

रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अनेक चालकांनी मराठी शिकण्यास सुरुवात केलीय. तर कारवाईच्या भीतीमुळे काही चालकांनी वाहन चालवणं तात्पुरतं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे, मुंबईतील रस्त्यांवर रिक्षा-टॅक्सींची संख्या कमी झाली असून, त्याचा थेट परिणाम प्रवासी सेवेवर जाणवतोय.. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत तसंच रेल्वे स्थानक परिसरात आणि व्यावसायिक भागांमध्ये प्रवाशांची मोठी गैरसोय होतेय. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अनेक रिक्षा आणि टॅक्सीची उपलब्धता कमी होती.

संबंधित व्हिडीओ