साखरेचे दर वाढल्याने आता कटिंग चहाही महाग होण्याची चिन्हं आहेत. चहा तयार करण्याचा खर्च वाढलाय.., त्याचा थेट परिणाम चहाच्या व्यवसायावर होत आहे. या पार्श्वभूमीवर वाढत्या उत्पादन खर्चाचा सामना करण्यासाठी 'टी-कॉफी असोसिएशनच्या बैठकीत कटिंग चहाची किंमत १५ रुपये करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद वाकोडे यांनी दिली.