Sugar Price Hike| साखर महागली, दिवाळीचा फराळ महागणार? दिवाळीत साखरेचा दर शंभरीपार जाणार?

दिवाळीचा सण जवळ येतोय. मात्र त्याआधीच साखरेच्या दरांनी सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणी पळवलंय. सध्या खुल्या बाजारात साखरेचा दर 80 रुपये किलोपर्यंत आहे. मात्र हाच दर शंभरीपार जाईल अशी भीती सर्वसामान्यांना वाटतेय. दिवाळीच्या काळात मिठाई, फराळ आणि इतर खाद्यपदार्थांसाठी साखरेची मागणी वाढते. लाडू, करंजी, शंकरपाळ्या तसंच अनारसे बनवण्यासाठी साखरेचा वापर केला जातो. त्यामुळे हा फराळही महागण्याची शक्यता आहे. मात्र व्यापाऱ्यांनी साठेबाजी करुन दर वाढवले जाणार नाहीत याची काळजी प्रशासनाकडून घेतली जातेय.

संबंधित व्हिडीओ