पाऊस कमी झाल्याने साखरेचे दर वाढले आहेत. मात्र पुढचे १० ते १५ दिवसांत पाऊस झाला नाही तर साखरेचे दर आणखी वाढतील अशी भीती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बोलून दाखवलीय. तर राज्यात साखरेची साठेबाजी केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलाय.