दादा गेल्यानंतर आपण सगळेच पोरके झालो, दादा गेल्यानंतर माणसांचे खरे चेहरे दिसले; Sunetra Pawar भावूक

बारामती तालुक्यात श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.. तीन दिवसांपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीत कार्यकर्त्यांच्या संवाद बैठका घेतायत. दरम्यान चोपडज येथील संवाद बैठकीत सुनेत्रा पवार भावुक झाल्या.प्रचार करण्याशिवाय माझा प्रत्यक्ष राजकारणाशी दुरान्वये संबंध नव्हता. पण अपघाताने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने आपण सर्वच पोरके झालो.. दादा नंतर आम्ही तर पोरके झालोच पण आपण सर्व पोरके होऊ नयेत म्हणून त्यांची जागा मी घेतली" असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे त्यांनी विरोधकांना इशाराही दिलाय..

संबंधित व्हिडीओ