राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना गोरगरीब रुग्णांना प्राथमिक उपचार मिळावा या उद्देशाने सुरू केलेला महत्त्वाकांक्षी उपक्रम, 'हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' त्यांच्याच बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात बंद पडल्याचे चित्र समोर आले आहे.ठाणे शहरात ज्या ठिकाणी 'आपला दवाखाना' सुरू करण्यात आला होता, त्यापैकी एका केंद्रात आता साड्यांचे दुकान सुरू झाल्याचे उघड झाले आहे. येणाऱ्या काळात जर या 'आपला दवाखाना' केंद्रातील कायद्यात असणाऱ्या परिचारिकांना आणि गाळा मालकांना थकीत भाडे मिळाले नाही, तर महापालिकेवर मोठे आंदोलन करू, असा इशारा स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे.