मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक तरतुदीसाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेचा खर्च भागवण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा तब्बल ३४४ कोटी रुपयांचा राखीव निधी या योजनेकडे वळवण्यात आला आहे. याआधीही अशा प्रकारे इतर विभागांचे निधी वळवल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. हा निधी का वळवण्यात आला आणि यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या कामांवर काय परिणाम होणार? संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये!