Drought| राज्यात उन्हाळ्यापूर्वीच हजारो बोअरवेल कोरड्या;बोअरवेलमधून येतंय पिण्यास अयोग्य पाणी

राज्यात कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत असताना उन्हाळ्याच्या पाच महिने आधीच पाणीटंचाईचे संकट गडद होताना दिसत आहे. राज्यातील हजारो बोअरवेल पाण्याअभावी बंद पडल्या असून अनेक ठिकाणी त्या नादुरुस्त अवस्थेत आहेत. नागपूर जिल्हा परिषद क्षेत्रातच तब्बल १,२०० हून अधिक बोअरवेल बंद असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रयत्नांनंतर पाणी मिळत असले तरी ते पिवळसर आणि पिण्यास अयोग्य असल्याची परिस्थिती आहे. यामुळे जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयांकडून बोअरवेल व विहिरींची पाहणी सुरू असून दुरुस्ती आणि खोलीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्याची तयारी सुरू आहे. याच वास्तवाचा जामठा परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी. Drought | Thousands of borewells in the state run dry even before summer; water unfit for drinking is being drawn from the borewells.

संबंधित व्हिडीओ