राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी शांततेत मतदान पार पडलं.एकूण 3 लाख 33 हजार 545 मतदारांपैकी 1 लाख 87 हजार 463 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत. 56.20 टक्के मतदान नोंदवण्यात आलं.मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री ईव्हीएम मशीन कडेकोट बंदोबस्तात राहुरी येथील लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयातील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत.