Operation Tiger अजुनही सुरुच? ठाकरेंचे 5 खासदार शिंदेंच्या संपर्कात | NDTV मराठी | Special Report

ठाकरे गटाचे पाच खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केलाय. आतापर्यंत ऑपरेशन टायगर मध्ये निवडून आलेला एकही आमदार किंवा खासदार शिवसेनेला आपल्याकडे आणता आलेला नाहीये. पण आता थेट पाच खासदारांना आपल्याकडे आणणार असल्याचं चॅलेंज शिंदेंच्या शिलेदारांनी दिलंय. शिवसेनेनं दिलेलं हे चॅलेंज जर खरंच पूर्ण झालं तर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तो मोठा राजकीय स्फोट असेल. पाहूयात हा रिपोर्ट. ऑपरेशन टायगर जे ज्यांचं नाव सर्वांनी मिळून दिलेलं आहे. त्याचा आता पुन्हा आणखीन जोमाने सुरुवात होते. मी उद्या असं म्हणालो, की त्यांच्या पक्षाचे सहा खासदार भाजप सामील होतायत. मला असं वाटत नाही की ते काही होऊच शकत नाही असं नाही कदाचित होऊ शकत. आणि सत्तेतली लोकही चर्चा करत राहणार विरोधकांना कमजोर करण्यासाठी. मंडळी एहा ना तुम्हाला अंदाज आलाच असेल, महाराष्ट्रामध्ये सुरु झालंय operation tiger. आणि हे टायगर आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन हजार चोवीस साली लोकसभेत निवडून गेलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे पाच खासदार हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून ते कोणत्याही क्षणी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात अशी बातमी समोर आली आहे.

संबंधित व्हिडीओ