पिंपरी चिंचवड शहरातल्या कुदळवाडी मध्ये बांधकाम प्रकरणी विलास लांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. काही दिवसांपूर्वी कुदळवाडी परिसरामध्ये पाच हजारांपेक्षा जास्त अनधिकृत बांधकामांवरती बुलडोझर चालवण्यात आलाय. त्यामुळे त्या ठिकाणी व्यवसाय करणारे उद्योजक आणि कामगार देशोधडीला लागलेत. असा आरोपच या पत्रातून करण्यात आला. बांगलादेशी आणि रोहिंग्या इथे खरंच सापडलेत का? असाही सवाल विलास दांडेंनी उपस्थित केलाय.