शरद पवार गटाचे नेते माधव जाधव मारहाण प्रकरणात अखेर गुन्हा दाखल झालाय.विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी माधव जाधव यांना परळीत मारहाण झाली होती. बँक कॉलनी परिसरातील मतदान केंद्रावर राजेसाहेब देशमुख यांच्या सोबत जाधव गेले असता हा प्रकार झाला होता.धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते कैलास फड त्याचा मुलगा निखिल फड याने ही मारहाण केल्याचा आरोप आहे.याप्रकरणी कैलास फड, त्याचा मुलगा निखिल फड यासह पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल झालाय.अखेर तीन महिन्यानंतर पोलिसांनी केला परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.आधीच हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कैलास फड चर्चेत आला होता.कैलास फड आणि त्याचा मुलगा निखिल फडवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी काय प्रतिक्रिया दिली.