पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आरोपांचा बॉम्ब फोडलाय. एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरांनी पुण्यात केलेली रेव्ह पार्टी ही फक्त पार्टीपुरती मर्यादित नसून याचे धागेदोरे मानवी तस्करीपर्यंत पोहोचलेत. प्राजंल खेवलकरांच्या मोबाईलमधून 250 अश्लील व्हिडिओ समोर आलेत. चित्रपटात काम देण्याच्या बहाण्यानं मुलींवर लैगिंक अत्याचार झाल्याचे आरोप चाकणकरांनी केलाय. ज्या ठिकाणी पार्टी झाली.त्या ठिकाणावरुन पोलिसांनी 10 मोबाईल जप्त केले त्यातून ही संपूर्ण माहिती समोर आलीय. त्यामुळे आता प्रांजल खेवलकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताय.