महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेत लातूर जिल्ह्यातील हजारो महिलांना मोठा धक्का बसला आहे. या योजनेतील निकषांची पडताळणी सुरू असून, त्यात ६६ हजारांहून अधिक महिलांना मिळणारा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. ही पडताळणी पूर्ण होईपर्यंत या महिलांना योजनेचा मासिक १५०० रुपयांचा हप्ता मिळणार नाही.