14 स्थानिक दहशतवाद्यांची ओळख पटली, स्लिपर सेलचं नेटवर्क उद्धवस्त करण्याचं कसं आव्हान? सखोल विश्लेषण

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता दोन महत्त्वाच्या मुद्दांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलंय.पाहलगाम हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वीच, पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील एका दहशतवाद्याने संभाव्य हल्ल्याचा संकेत दिला होता. परंतु, सुरक्षा यंत्रणांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.हा हल्ला अत्यंत नियोजित होता.तर दुसरीकडे आता NIAने पहलगाम हल्ल्याच्या तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. या तपासात १४ स्थानिक दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आहे, जे लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या संघटनांशी संबंधित आहेत.या व्यक्तींनी परदेशी दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवर मदत केली आहे. - १४ स्थानिक दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आहे. स्लिपर सेलचं हे नेटवर्क उद्धवस्त करण्याचं कसं आव्हान आहे? यावर सतीश ढगे यांचं सखोल विश्लेषण पाहा.

संबंधित व्हिडीओ