पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ विरारमध्ये आंदोलन करण्यात आलंय.विरार पूर्वेच्या मनवेल पाडा परिसरात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी परिसरातील रहिवाशांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा केल्या.आंदोलनात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते.