सीआरपीएफ जवान मुनीर अहमद यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांनी एका पाकिस्तानी महिलेशी विवाह केला होता आणि ही माहिती लपवून ठेवली होती, असा त्यांच्यावर आरोप आहे. सीआरपीएफने या कृतीला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक मानले आहे.