खासदार संजय राऊत यांनी आज खासदार शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.नरकातील स्वर्ग या त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे औपारिक निमंत्रण देण्याकरता ही भेट घेण्यात आली होती. यासंदर्भातील माहिती शरद पवारांनी समाज माध्यमांवरून दिली आहे.संजय राऊतांनी भेट दिल्यानंतर शरद पवारांनी त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.भेटीदरम्यान रोहन तावरे यांनी लिहिलेल्या वन्यजीवनावर आधारित पुस्तकावर सविस्तर चर्चा झाली.त्याचप्रमाणे, राज्य व देशातील विविध मुद्द्यांवरही विचारमंथन झाले... असं शरद पवारांनी पोस्टमध्ये म्हटलंय.