येवल्याच्या देवळाणेमध्ये घराचे छत कोसळून 3 जखमी, भुजबळांकडून Video Call करून जखमींची विचारपूस

नाशिकच्या येवला तालुक्यातील देवळाणे या गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे घराचं छत कोसळलं.. यात गंभीर जखमी झालेल्या दोन वृद्ध महिला आणि एक लहान मुलावर अंदरसुल येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. त्यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून जखमींची विचारपूस केली.. तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरशी चर्चा केली... दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून जखमींच्या उपचाराचा खर्च आणि सरकारकडून घराची दुरुस्ती करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.

संबंधित व्हिडीओ