Laturच्या ट्युशन एरियाची चर्चा,औद्योगिक वसाहतीच्या जागेवर मोटेगावकरचा क्लास; याचाच ड्रोनद्वारे आढावा

नीट पेपरफुटी प्रकरणात प्राध्यापक शिवराज मोटेगावकरचं नाव समोर आल्यानंतर लातूरमधील प्रसिद्ध ट्युशन एरियाची पुन्हा जोरदार चर्चा सुरू झालीय.. जुनी एमआयडीसी स्थलांतरित झाल्यानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणावर कोचिंग क्लासेस सुरू झाले. आरसीसीसह अनेक क्लासेसनी व्यवसायासाठी असलेल्या गोडाऊन आणि व्यापारी जागा भाडेकराराने घेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा व्यवसाय उभा केला.. महाराष्ट्रभर “ट्युशन एरिया” म्हणून ओळख मिळालेल्या या भागात आरसीसी कोचिंग क्लासेसचे मुख्य कार्यालय असून जुन्या एमआयडीसीतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मोटेगावकरच्या ताब्यात जागा असल्याची चर्चा आहे. औद्योगिक वापरासाठी असलेल्या एमआयडीसीच्या जागांचा शिक्षणासाठी वापर होत असल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत...

संबंधित व्हिडीओ