लातूर शहरात शिवराज मोटेगावकर यांच्या पाच मजली आलिशान बंगल्याची जोरदार चर्चा आहे. या बंगल्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचंही पाहायला मिळालं. त्यानंतर मोटेगावकर यांनी नेमकी एवढी संपत्ती कशी उभी केली आणि या संपत्तीतून हा बंगला कसा उभारला याबाबत विविध चर्चांना उधाण आलंय..