Nashik TCS प्रकरणी विजया रहाटकरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महिला आयोगाची सुनावणी, सुनावणीत काय घडलं?

नाशिकच्या TCS धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण सुनावणी पार पडलीय.. गुन्ह्याचे गांभीर्य समोर येऊनही एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने नाशिकच्या कंपनीत थेट कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी भेट का दिली नाही? असा संतप्त सवाल रहाटकरांनी केलाय.. आयोगाने नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, HR संबंधित सुविधा आणि PoSH कायद्याच्या अंमलबजावणीबाबत गंभीर चिंता व्यक्त केलीय... त्याचबरोबर TCS च्या सर्व 127 युनिटमध्ये चार आठवड्यांच्या आत स्वतंत्र अंतर्गत समित्या, सर्वसमावेशक POSH प्रशिक्षण कार्यक्रम आणि इतर यंत्रणा तात्काळ राबवण्याच्या सूचनाही आयोगाने दिल्या...

संबंधित व्हिडीओ