मराठवाड्यातील पाणीप्रश्नाचा आढावा घेण्यासाठी एनडीटीव्ही मराठीची टीम सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. आज हिंगोली तालुक्यातल्या खंडाळा गावात, ही टीम पोहोचली...साधारण दीड दोन हजार लोकवस्तीचं हे गावं...या गावात भीषण पाणीटंचाई आहे. महिला आणि मुलांना हंडाभर पाण्यासाठी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका विहिरीवर जावं लागतं. प्यायला, सांडायलाही याच विहिरीचं पाणी. काही महिला धुणं धुण्यासाठी याच विहिरीवर जातात. त्या विहिरीवर आम्ही पोहोचलो आणि पाणी घेण्यासाठी आलेल्या महिलांसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांच्या रोजच्या जगण्यातली सर्वात मोठी अडचण ही पाणीच असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्याशी बातचित केलीय आमचे प्रतिनिधी सागर जोशी यांनी.