जळगाव मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलंय... महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्येच जागावाटपावरून रस्सीखेच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जळगाव विधान परिषदेची जागा कोणाच्या वाट्याला जाणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.