तुळजापूर ड्रग्स प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. आरोपी महिलेच्या बँक खात्यातनं पाच कोटींचे व्यवहार झालेले आहेत. दरम्यान ड्रग्स साठी आर्थिक व्यवहार झालेत का? कोणाच्या माध्यमातून व्यवहार झाले याचा तपास आता पोलिस ड्रग्स प्रकरणी आरोपी महिला संगीता गोळे हिच बँक खातं पोलिसांनी सील केलंय. गोळेची मुंबईसह लोणावळ्यात सुद्धा मालमत्ता आहे. तुळजापूर ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत सोळा आरोपी समोर आलेले आहेत. त्यातील फरार आरोपींचा शोध सुरु आहे. तुळजापुरातील काही स्थानिक नेत्यांचाही ड्रग्स प्रकरणामध्ये समावेश असल्याची माहिती मिळते आहे.