छत्तीसगडमध्ये सैनिकांच्या मोठ्या कारवाईला यश आलंय. नक्षलवादी लपत असलेली मोठी गुहा सैनिकांना सापडली.एक हजार नक्षलवादी लपू शकतात अशी गुहा त्यांना सापडली. करेगाट्टाच्या टेकड्यांवर ही मोठी गुहा सापडली.5 दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान सैनिकांना मोठं यश आलंय.NDTV मराठी चा हाती या नक्षलवादी गुहेचे फोटो आणि व्हिडिओ मिळाले आहेत जे सैनिकांनी ऑपरेशन दरम्यान जप्त केले आहेत.गुहेमध्ये पाण्यापासून ते विश्रांतीच्या सुविधांपर्यंतच्या सर्व सुविधा आहेत.गुहेच्या आत मोठं मैदानही सापडलंय.