Pimpri Chinchwad मध्ये नदी सुधार प्रकल्पाला विरोध, शेकडो पर्यावरणप्रेमी उतरले रस्त्यावर| NDTV मराठी

पिंपरी चिंचवडमध्ये नदी सुधार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आज शेकडो पर्यावरण प्रेमी रस्त्यावर उतरलेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने हा प्रकल्प राबवला जातोय.प्रकल्पांतर्गत मुळा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर भराव टाकला जात असून, या प्रकल्पांमुळे नद्यांची वहन क्षमता कमी होणार आहे. त्याविरोधात 100हून अधिक संघटना रस्त्यावर उतरल्यात.शहीद अशोक कामठे उद्यान ते पिंपळे निलख स्मशान भूमी असा लाँग मार्च काढून संघटनांनी प्रशासनाचे लक्ष वेधलंय. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आज या मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन या नदीसुधार प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली.

संबंधित व्हिडीओ