भारताने झेलमचं पाणी सोडलं, POKत अचानक पूर, आणीबाणी लागू; जीव वाचवण्यासाठी लोक घर सोडून पळालं

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध अधिक तणावपूर्ण झाले आहेत. शेजारी देशाला एकाकी पाडण्यासाठी भारताने अनेक निर्बंध लादले आहेत. यामध्ये सिंधू जल कराराच्या स्थगितीचाही समावेश आहे. भारताच्या बंदीमुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये झेलम नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याची माहिती आहे. त्यामुळे तिथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. भारताने कोणतीही पूर्वसूचना न देता शनिवारी उरी धरणातून पाणी सोडल्याचा दावा स्थानिक अधिकाऱ्यांनी केला आहे. पीओके अधिकाऱ्यांनी भारतावर जल दहशतवादाचा असा आरोप केला आहे. अचानक पाणी सोडल्यामुळे पीओकेच्या हट्टीयन बालामध्ये पाण्याची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. नदीकाठावर राहणाऱ्या स्थानिक सुरक्षित स्थळी धाव घेत आहेत.

संबंधित व्हिडीओ