साडेपाच फुटांची लांबी… तब्बल 23 किलो वजन… आणि अंगावर काटेरी रांग! एवढा मोठा सरडा समोर पाहून कुणालाही आश्चर्य वाटेल. राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे सुरू असलेल्या गंगागिरी महाराजांच्या 179 व्या सप्ताहानिमित्त आयोजित भव्य कृषी प्रदर्शनात सध्या अशाच एका अनोख्या पाहुण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अमेरिकन इगुआना प्रजातीचा ‘टॉनी’ हा इगुआना प्रदर्शनाला भेट देणाऱ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.हिरवट-करड्या रंगाचं शरीर… पाठीवर ठळक काटेरी रांग… मोठे पंजे आणि भलीमोठी शेपटी… हे आहे ‘टॉनी’ या अमेरिकन इगुआनाच्या जातीचा सरडा आहे. साडेपाच फूट लांबी आणि तब्बल 23 किलो वजन असलेला ‘टॉनी’ कृषी प्रदर्शनातील एक वेगळंच आकर्षण ठरला आहे. त्याचा एवढा मोठा आकार पाहून प्रदर्शनाला येणाऱ्या नागरिकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.
5.5 foot long 23 kg ‘Tony’ lizard becomes the star attraction at shirdi agricultural exhibition