भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मॉस्कोमध्ये अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली.सोमवारी रशियन राष्ट्रपती कार्यालय क्रेमलिनमध्ये ही भेट झाली.यावेळी रशिया आणि भारतामध्ये दशकांपासून मजबूत संबंध आहेत.दोन्ही देशांमधील व्यापा यंदा वाढल्याची माहिती स्वतः पुतीन यांनी दिली.परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना भारतात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत आमंत्रण दिलं. जयशंकर रविवारी मॉस्कोला पोहोचले होते. ते रशियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन 12-13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या BRICS परिषदेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, जयशंकर यांनी सोमवारी मॉस्कोमध्ये रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव यांचीही भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी भारत-रशिया यांच्यातील व्यापार आणि आर्थिक सहकार्य आणखी वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांमधील भागीदारी वाढवण्यावरही चर्चा झाली.