सोशल मीडियाचा अतिवापरामुळे किशोरवयीन मुलांवरील विपरित परिणाम रोखण्यासाठी आता न्यूझीलंडनंही मोठं पाऊल उचललंय. १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालण्यासंदर्भातील विधेयक आणलंय. याची घोषणा न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्झन यांनी केलीय. मात्र हे बिल पास करवून घेण्याचं मोठं आव्हान लक्झन् यांच्यासमरो असणार आहे. कारण त्यांच्या युती सरकारमधील तीन पैकी दोन पक्षांनीच या विधेयकाला विरोध दर्शवलाय.
त्यामुळे नोव्हेंबरमधील सार्वत्रिक निवडणुका पार पडण्याआधी हे विधेयक पास करवून घेण्याची मोठी कसरत लक्झन सरकारला करावी लागणार आहे. शिवाय जनतेच्या मनी हे बिल रुजवण्यासाठीही मोठी मेहनत लक्झन सरकारला करावी लागू शकते.न्यूझीलंड आधी ऑस्ट्रेलियानं २०२५मध्ये अशी बंदी लागू केलेली आहे. कोणकोणत्या देशांमध्ये किशोरवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी आहे पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून