हिंगोलीतील कावड यात्रेत धार्मिक कार्यक्रमासोबतच राजकीय चर्चांनाही उधाण आल्याचं पाहायला मिळालं.या यात्रेत खासदार श्रीकांत शिंदे आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर सहभागी झाले होते. समारोप कार्यक्रमादरम्यान आमदार संतोष बांगर यांना मंत्री करण्याच्या मागणीच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या आणि त्यासंदर्भातील बॅनरही झळकावण्यात आले. याचवेळी आमदार संतोष बांगर यांनी महादेवाच्या चरणी साकड घालत महादेवा, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी बसव, अशी प्रार्थना केली. तर दुसरीकडे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मिश्कील शैलीत, संतोष बांगर यांना मंत्री केलं तर महाराष्ट्रात हाहाकार होईल, अशी टिप्पणी करत उपस्थितांमध्ये एकच हशा पिकवला. त्यामुळे कावड यात्रेत राजकीय चर्चांचीही रंगत पाहायला मिळाली.